पुणे :- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध यांच्या संयुक्त विद्यमाने पर्वती विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक बिबवेवाडी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मागदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर.बी. भावसार, उपप्राचार्य यशवंत कांबळे, नगरसेवक महेश वाबळे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
यावेळी आमदार मिसाळ म्हणाल्या, कोणताही व्यवसाय अथवा नोकरी ही कमी दर्जाची नसते. तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्विकारलेल्या क्षेत्रात चांगले काम केल्यास त्यांची निश्चित प्रगती होईल. तसेच स्वयंरोजगार व स्टार्टअपच्या माध्यमातून देखील तरुणांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत असेही त्या म्हणाल्या.
उपसंचालक श्री. भावसार, यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम, मुलींसाठीच्या औद्योगिक क्षेत्रातील संधी व शासनाच्या विविध योजना, भगवान पांडेकर यांनी दहावी, बारावीनंतर पुढे काय, अरविंद केळकर यांनी Swor Analysis याबद्दल माहिती देऊन व्यक्तिमत्व विकासासंबंधी मार्गदर्शन केले.
सचिन येडे यांनी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग अभ्यासक्रम, डिप्लोमा कोर्सेस व प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती दिली.