अखिल भारतीय महिला कॉंग्रेसचा ४० वा वर्धापनदिन कॉंग्रेस भवन येथे उत्साहात साजरा

पुणे : अखिल भारतीय महिला कॉंग्रेसची स्थापना दिनांक १५ सप्टेंबर १९८४ झाली.त्याच्या पहिल्या अध्यक्षा बेगम अबिदा अहमद या होत्या. अखिल भारतीय महिला कॉग्रेसच्या वर्धापनदिना निमित्त कॉंग्रेस भवन येथील ग्राउंड मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सोनल पटेल यांच्या हस्ते केक कापून अखिल भारतीय महिला कॉग्रेसचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

या नंतर प्रतिज्ञा उज्वल भारतीय या प्रतिज्ञेचे सर्व महिलांनी वाचन करून प्रतिज्ञा घेतली.यानंतर महिलांचे मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये वकृत्व स्पर्धा , गाण्याच्या भेंड्या आदी कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या कमिटीच्या उपाध्यक्षा श्रीमती संगिता तिवारी, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, पुणे शहर महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद, रजिया बल्लारी,उषा राजगुरू,सुंदरा ओव्हाळ, ज्योती चंदेवळ सोनिया ओव्हाळ, सीमा महाडिक, पौर्णिमा भगत लता गडसिंग, कविता भागवत ,पपिता सोनावणे, गीता तारु, निलोफर शेख इत्यादी महिला उपस्थित होत्या.तसेच यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, नगरसेवक रफिक शेख, राष्ट्रवादीचे मा अंकुश काकडे उपस्थित होते.

See also  विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ