सुतारवाडी स्मशानभूमी परिसरातील दुरुस्ती व गाळ काढण्या साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन

सुतारवाडी : सुतारवाडी स्मशानभूमीत दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी व चिखल साचला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मृत्यू नंतरचे धार्मिक कार्य करण्यास अडचण येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने औंध क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना निवेदन देण्यात आले.

सुतारवाडी स्मशानभूमी येथील स्वच्छता व दुरुस्तीच्या कामास हवा असलेला निधी लवकरात लवकर महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख संतोष तोंडे,उपविभाग प्रमुख दिनेश नाथ ,प्रभाग प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, शिवदूत महेश सुतार, आप्पा पाटील आदी उपस्थित होते.

See also  मोदी की गॅरंटी अशी आहे, चेक गॅरंटीचा आहे फक्त त्याच्यावर तारीख लिहिलेली नाही - शरद‌ पवार