प्रभाग 28 मधील ४०० नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ – गणेश शेरला

पुणे : नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या लक्ष्यात घेत गणेश शेरला यांनी माझा प्रभाग कॅन्सर मुक्त प्रभाग या उपक्रमा अंतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून दिलेली मोफत मेडिकल चेकअप मोबाईल व्हॅन महर्षिनगर गुलटेकडी भागात नागरिकांकरिता उपलब्ध केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य प्रसन्नजीत फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून या आरोग्यशिबिरास सुरुवात करण्यात आली. २ दिवस हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये गणेश शेरला यांच्या माध्यमातून ९५००/- रुपयांच्या सर्व तपासण्या मोफत घेण्यात आल्या. या आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद वस्ती भागातून मिळाला. जवळपास ४०० नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. या मोबाईल मेडिकल चेकअप व्हॅनमधे जागेवरच तपासण्या करत रिपोर्ट देण्यात आले.

या शिबिरास माजी नगरसेवक भरत वैरागे, प्रकाश बाफना, श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबोले, अजय खेडेकर, राजश्री शिळीमकर, जीवन माने, डॉ.प्रसाद खंडागळे, राहुल गुंड, युसुफ मोमीन, राहुल पाखरे, तुकाराम डुबेकर, किरण वैष्णव, सचिन खंडागळे , तोसीफ पठाण, बाळासाहेब शेलार , विकास गायकवाड , मंगेश शहाणे, गणेश शिवशरण, संतोष गुरू या सर्वांनी या शिबिरास भेट देऊन गणेश शेरला यांचे कौतुक केले.

भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 28 व एकता सेवा प्रतिष्ठान यांच्या पदाधिकारी रविराज राजभर ,दीपक साळुंखे ,अक्षय मदने ,महेश साळुंखे ,प्रशांत वर्मा , लावण्या अरकल,कोमल साळुंखे ,हिना शेख ,सागर नराल ,मारुती कांबळे , अक्षय तुपे,अनिल विसरे रोहन गायकवाड यांच्या परिश्रमाने हे आरोग्यशिबिर संपन्न झाले.

See also  गणेश भक्तांच्या मदतीला माय माऊली धावली