महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भुजबळ टाउनशिप, एकलव्य चौक, कोथरूड येथील सोसायट्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश

पुणे : भुजबळ टाउनशिप व जवळील सोसायट्यांना बऱ्याच वर्षांपासून मेजर पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, पाइपलाइन तपासणी किंवा इतर कोणत्या कारणामुळे हा प्रश्न उद्भवला आहे, हे कोणीही सांगत नव्हते, आणि नागरिकांनी विचारणा केल्यावर वेगवेगळी कारणे, पाणी पुरवठा विभागाकडून आणि इतर माध्यमातून देण्यात येत होती व टाळाटाळ केली जात होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूडच्या शाखाअध्यक्ष सौ.यामिनीताई मठकरी यांनी या प्रश्नाची दखल घेत, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत विचारणा केली असता आणि सतत पाठपुरावा केल्यावर, अधिकाऱ्यांनी कळवले की कुठलाही बजेट इश्यू किंवा इतर कारण नाही.पाइपलाइन बदलण्याचे पत्र सीनिअर अधिकार्याना दिले, त्यांचे कन्फरमेशन आणि तांत्रिक अडचणीं क्लिअर झाल्या तर आम्ही पाईपलाईनचा प्रश्न लगेच सोडवू शकतो.

या प्रश्नाला अजून वेळ जाऊ नये म्हणून यामिनी मठकरी यांनी नागरिकांची भेट मनसे पक्षाचे सरचिटणीस, मा.नगरसेवक, किशोरजी शिंदेंच्या यांच्याशी घालून दिली. आणि पाणी विभाग अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा, आणि त्यावर काही पुढे येणाऱ्या मेजर अडचणी यावर किशोर शिंदेंनी पाणी व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करत इथे पाणी का येत नाही, यावर जाब विचारला.
आणि अधिकाऱ्यांना सांगितले की, नागरिकांना पाणी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे,वेळ न घालवता त्वरित हा प्रश्न सोडवला गेलाच पाहिजे. हे बोलणे झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ते पत्रक आमच्याकडे देण्यात आले, आणि नागरिकांपर्यंत ते आम्ही पोहचवले.

भुजबळ टाउनशिपचा पाणी प्रश्न मनसे पक्ष 100% सोडवणारच हे आश्वासन किशोर शिंदे आणि यामिनी मठकरी यांच्याकडून नागरिकांना देण्यात आले.

टॅक्स वेळेत भरला जाऊनही नागरिकांना पाणी मिळत नव्हते, उडवाउडविची उत्तरे देण्यात येत होती, आणि नागरिकांना याप्रकारे वर्षानुवर्षे हा त्रास सहन करावा लागला.पाणी प्रश्न का सोडवला जात नाही याचे उत्तरही नागरिकांना मिळत नसेल आणि पत्रही मनसे पक्षाच्या पाठपुराव्याने मिळत असेल. तर हा कारभार नेमका कोणाच्या मनमानीने चालतोय,
हा प्रश्न उपस्थित होतो?

See also  भाजपा आयोजित बालेवाडी येथे रक्तदान शिबिरामध्ये १२७६ रक्तदान

प्रशासन याप्रकारे नागरिकांना वागवत असेल तर मनसे पक्ष ते सहन करणार नाही.मनसे पक्षाच्या पाठपुराव्याने मिळालेल्य पत्रामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अधिकाऱ्यांनी त्या एरियात येऊन लगेच पाहणीही केली, आणि पाहणी करून आता लवकरात लवकर या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनचे नेटवर्क विकसित करून ती बदलण्याचे काम सुरू होणार आहे, आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सुटणार आहे… ही माहिती कोथरूड मनसे शाखाध्यक्षा सौ.यामिनी मठकरी यांच्याकडून देण्यात आली.