पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाषाण येथे निदर्शने

पाषाण : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याकरिता व दहशतवादी पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुस रोड येथील साई चौकात आंदोलन करण्यात आले.

दहशतवादी प्रवृत्तीच्या पाकिस्तानला आता भारत सरकारने जशास तसे उत्तर द्यावे, त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या,आपण निदान विचार करून खरेदी-विक्री करावी आशा भावना श्री सुकुमार बडवे यांनी व्यक्त केल्या, मोदी सरकारचा पाकिस्तान विरुद्धचा प्रत्येक निर्णयाला जनतेने पाठींबा द्यावा असे संघाचे स्वयंसेवक श्री दीपक रत्नालिकर यांनी सांगितले‌. गिरीश चोक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भाजपचे  पुणे शहर सचिव श्री राहुल कोकाटे,सौ मयुरी कोकाटे यांनी सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. श्रीमती विनया विध्वंस  यांनी पाकिस्तानचा पापांचा घडा भरला आहे आता त्यांना कडक शासन करण्याची मागणी केली.


शेकडो नागरिक यावेळी मेणबत्त्या घेऊन श्रध्दांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. रत्नाकर मानकर, उत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, विकास पाटील, चैतन्य तिवारी, रघुनाथ उत्पात, राणी मेहता, देवीसिंह पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

See also  अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथ प्रदर्शनास अभुतपूर्व प्रतिसाद