स्वा.वीर सावरकर मित्र मंडळाच्या ३१व्या ‘रक्तदान यागा’त रखरखत्या उन्हाळातही 280 रक्तदात्यांचे उत्साही रक्तदान

कोथरूड : एरंडवणा भागातील स्वा.वीर सावरकर मित्र मंडळ (ट्रस्ट) एरंडवणे व राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने कै. शिरिष तुपे यांच्या स्मरणार्थ सलग ३१व्या वर्षी भव्य रक्तदान यागात 280 रक्तदात्यांचे उत्साही रक्त संकलन करण्यात आले. गेली 30 वर्ष अविरतपणे हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे कोथरूड एरंडवणे परिसरामध्ये या रक्तदान शिबिराचे एक अनन्य साधारण महत्त्व आहे.

रक्तदान शिबिराचे आयोजक राम बोरकर यांचे सर्वपक्षीय मित्रपरिवार यामध्ये उत्साहाने सहभागी होत असतात. आजच्या रक्तदान शिबिरामध्येही स्वपक्षीय मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यासह अन्य पक्षांचे पदाधिकारी ही उत्साहाने सहभागी झाले होते. प्रमुख मान्यवरांमध्ये मनसे युवा नेते अमित राज साहेब ठाकरे नवनिर्वाचित खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी भेटी दिल्या.

एक कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता अशी कायम ओळख जपणारे कै. शिरीष तुपे यांचे व्यक्तिमत्व होते नव्या तरुणाईला त्यांच्या विचारांची आणि तत्त्वाची कायम स्मरण देण्याचे काम या रक्तदान शिबिरातून केले जात असून या माध्यमातून एक मैत्रीच ही अमूल्य नातं जपलं जात असल्याचे मत नवनिर्वाचित खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केले. देशात नव्हे तर जगात माणसाच्या फक्त चारच जाती असून त्या फक्त रक्तगटाच्या आहे ही वैश्विक एकता जपणूक केली तर सर्व जग वसुदैव कुटुंबकंम झाल्याशिवाय राहणार नाही असेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. तर मनसे नेते रणजीत शिरोळे यांनी मैत्री कशी जपावी आणि मित्राचे वैचारिक वारसत्व कशाप्रकारे जपायचं याची जाणीव राम बोरकर यांच्या रक्तदान शिबिरातून होत असते. मैत्रीचं नातं कायमच नवचैतन्य आणि उत्साहाची उर्मी देणार असल्याची जाणीव या रक्तदान शिबिरातून संयोजक राम बोरकर करून देत असतात असे सांगितले.

See also  LIC च्या शेअर्स मध्ये ४० % ची घसरण.