बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या  रक्तदान शिबिरात १३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

खडकवासला : बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या  रक्तदान शिबिरात १३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. बँकेचे मुख्यालय असलेल्या लोकमंगल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

शिबिराचे संयोजन बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट सहकारी सोसायटी, बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी कल्याण संघटना आणि बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ यांच्या वतीने संयुक्तविद्यमाने करण्यात आले होते. या सर्व संघटना भारतीय मजदूर संघाशी (BMS) संलग्न आहेत. रक्तदान शिबिराचे नियोजन जनकल्याण रक्तपेढी, पुणे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.


शिबिराचे उद्घाटन बँकेचे कार्यकारी संचालक रोहित ऋषी यांच्या हस्ते झाले. तसेच बँकेचे कार्यकारी संचालक  आशिष पांडे आणि इतर वरिष्ठ महाप्रबंधकांनी शिबिराला भेट देऊन दात्यांचे कौतुक केले. यावेळी  रोहित ऋषी यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिरात सहभाग नोंदवून उपस्थितांना प्रेरणा दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे संस्थापकांना आदरांजली म्हणून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त १३६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. .
बँक ऑफ महाराष्ट्रमधील भारतीय मजदूर संघाशी संलग्न संघटनांनी बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून, जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजाप्रती आपले योगदान दिले भावना रोहित ऋषी यांनी व्यक्त केली.

See also  ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे