ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेवक अर्चना मुसळे यांनी नागरिक व अधिकाऱ्यांसोबत अपघात ठिकाणी रस्त्यावर समन्वयाची बैठक घेत केली कारवाईची मागणी

औंध : पुणे मनपा पथविभागाच्या दुर्लक्ष पणामुळे औंध मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू नंतर ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेवक अर्चना मुसळे यांनी नागरिक व अधिकाऱ्यांसोबत अपघात ठिकाणी रस्त्यावर समन्वयाची बैठक घेऊन कारवाईची मागणी केली.

औंध मधील भाले चौका जवळील नागरस रोड वर हॉटेल राहुलच्या समोर फुटपाथ व काँक्रीट रस्त्याच्या मधातील ब्लॉग पूर्ण खराब झाल्यामुळे काल दुचाकी वर जाणाऱ्या पिण्याक गंगोत्री औंध या सोसायटीमध्ये राहणाऱ्या जगन्नाथ काळे या ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी तेथे घसरून ते रस्त्यावर पडले व पाठीमागून येणाऱ्या चार चाकी वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पुणे मनपा प्रशासनाच्या कार्यकाळात शहराची दुरावस्था झाली असून पथ विभागाच्या अक्षम दुर्लक्षपणा व हलगर्जीपणा मुळे श्री जगन्नाथ काळे यांचा नाहक जीव गेला

या संदर्भात भाजपा प्रदेश प्रवक्ते ॲड डॉ मधुकर मुसळे व मा. नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री गिरीश दापकेकर पथविभागाचे कार्यकारी अभियंता श्री रमेश वाघमारे अभियंता श्री दिलीप काळे उप अभियंता श्री देवकर कनिष्ठ अभियंता स्वाती गनपिले वाहतूक विभागाचे अधिकारी श्री चव्हाण इत्यादी अधिकाऱ्यांच्या उपस्थित नागरिकांसोबत अपघात स्थळी रस्त्यावर बैठक घेतली.

यावेळी नागरिकांमध्ये प्रक्षोभ होता ॲड. मधुकर मुसळे यांनी नागरिकांच्या वतीने या भागातील तक्रारी मांडल्या व त्यावर तातडीने काम करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले नागरिकांनीही पुणे मनपा व पोलीस अधिकाऱ्यांना फुटपाची झालेली दुरावस्था वाढलेला अतिक्रमण वाहतूक कोंडी या इत्यादी विषयावर अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाबद्दल त्यांना जाब विचारला.
फुटपाची झालेली दुरावस्था फुटपाथ व काँक्रीट रोडच्या मधातील रस्त्याची दैनंदिन दैननीय तातडीने दुरुस्त करून चौकाच्या सर्व बाजूस नो हॉलटिंग , नो पार्किंग चे बोर्ड लावणे मेडीपॉइंट हॉस्पिटल चौकाचे ताबडतोब रस्ता रुंदीकरण करणे पेडस्ट्रियन क्रॉसिंग बनविणे चौकातील सिग्नलचे टायमर गरजेनुसार बदलणे औंध मधील सर्व अतिक्रमणावर तातडीने कारवाई करून ते काढून टाकने व त्यांच्यावर वेळोवेळी नियमितपणे कारवाई करणे इत्यादी विषय अधिकाऱ्यांनी तातडीने करण्याचे मान्य केले.

See also  भारताच्या विकास प्रक्रियेत 'विकसित भारत संकल्प यात्रा' अत्यंत महत्वाची ठरेल-केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी