खडकी कॅन्टोन्मेंट भागातील खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा आप चा इशारा

पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील होळकर ब्रिज चौक, तसेच मुळा रोड, भैय्यावाडी चौक  ते खडकी बाजार रोड या सर्वच गर्दीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असून गेल्या दोन महिन्यापासून आम आदमी पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते या संदर्भात कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत. अनेक स्थानिक नागरिकांनी सुद्धा याबाबत तक्रार दिलेली होती. परंतु कॅन्टोन्मेंट प्रशासन या संदर्भात ढीम्म असल्यामुळे काल शुक्रवार रोजी आम आदमी पार्टीने सदरच्या जागेवरून दुपारी सोशल मीडियावर  खड्डे व वाहतूक कोंडीचे व्हिडिओ लाईव्ह केले तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहन चालकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली.


खडकी कॅन्टोन्मेंट येथे गेले अनेक वर्ष निवडणुकाच न झाल्यामुळे त्याला कोणी वाली उरलेला नाही. तसेच प्रशासनही यासंदर्भामध्ये काहीही कार्यवाही करत नाही. मुख्य म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इमारतीजवळच्या चौकातच मोठे खड्डे असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्या चौकातून खडकी प्रशासनाचे अधिकारी रोज येजा करतात तरीसुद्धा ते खड्डे बुजवण्याचे काम झालेले नाही. स्थानिक आमदार शिरोळे मात्र त्या चौकातही बॅनरबाजी करीत आहेत असा रोष आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला.
या संदर्भात तातडीने खड्डे दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात आले. असून यावेळेस आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांचे सोबत पदाधिकारी मनोज एरांडकर ,अजय पारचा, विकास चव्हाण, अमोल मोरे, संजय कटारनवरे, तहसीन शेख आदी उपस्थित होते.

See also  जी-20 च्या स्वागतासाठी अनधिकृत केबलची रांगोळी? अनाधिकृत केबल मुळे पालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान