बाणेर : शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल इंडियन हेरिटेज & हेल्थ केअर सेंटर यांच्या वतीने बालेवाडी चे माजी सरपंच गणपतराव बालवडकर यांना ” भारत सन्मान 2024″ पुरस्कार पुरस्कार मिळाल्याबद्दल योगीराज पतसंस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच योगीराज पतसंस्थेतील कर्मचार्यांना दिवाळी बोनस, एक पगार वाढ व दिवाळी अॅडव्हान्सचे गणपतराव बालवडकर व स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संस्थापक रामदास मुरकुटे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेतील कर्मचारी वर्षभर चांगले काम करत असतात त्यांच्या वर्षभराच्या कामाची शाबासकी म्हणून यावर्षी एक पगार वाढ दिलेली आहे. तसेच पगार वाढीतील एप्रिल पासूनचा फरक आणि दिवाळी अॅडव्हान्स अशी एकूण रक्कम 20 लाख 65 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, माजी संचालक अॅड. अशोक रानवडे, गणपतराव बालवडकर, रामदास मुरकुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
























