चंद्रकांत पाटील, मिसाळ, शिरोळे यांची उमेदवारी जाहीर , कसबा, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट प्रतिक्षेत

पुणे – भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली असून त्यात ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आमदार माधुरी मिसाळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात कोथरूड मधून चंद्रकांत पाटील, पर्वती मधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावांचा समावेश आहे.

याखेरीज पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मधून महेश लांडगे, चिंचवड मधून शंकर जगताप आणि पुणे जिल्ह्यातील दौंड मधून राहुल कुल यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरातील कसबा, वडगाव शेरी, खडकवासला आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपच्या पहिल्या यादीत केलेली नाही.

See also  भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार