भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील पाषाण, बाणेर सोमेश्वरवाडीतील ग्रामदैवतांच्या दर्शनाला, ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत;केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती

पाषाण : भाजपा उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी बाणेर सोमेश्वरवाडी, पाषाण मधील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करुन, विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर,पुनम विधाते,सरचिटणीस सचिन दळवी,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अस्मिता करंदीकर,मोरेश्वर बालवडकर,अनिकेत मुरकुटे, शिवम सुतार, राजेंद्र पाषाणकर,प्रवीण शिंदे, उत्तम जाधव, विवेक मेथा,रोहन कोकाटे, सचिन सुतार, सुभाष भोळ, सचिन सुतार,सुशील सरकते,कल्याणी टोकेकर, निकीता माथाडे, वैशाली कमासदार, पुनम विधाते, भगवानतात्या निम्हण,ज्ञानेश्वर पारखे,पोपटराव जाधव, तानाजी काकडे, काशिनाथ दळवी,यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रविवारी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. आज सोमवारी पाषाण मधील मारुती भैरवनाथ, बाणेर मधील भैरवनाथ मंदिर आणि सोमेश्वर वाडीतील सोमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी नागरिकांकडूनही नामदार पाटील यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत  नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्व पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख मताधिक्याने विजयी करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

यावेळी नामदार पाटील कृतज्ञता व्यक्त करत, गेल्या पाच वर्षांत कोथरुडकरांची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे पक्षाने पुन्हा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देऊन कोथरुड करांच्या सेवेची संधी दिली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

See also  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे यांच्या घरी सदिच्छा भेट