पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. दत्ता बहिरट यांच्या “व्हिजन छत्रपती शिवाजीनगर २०२४” या जाहीरनाम्याचे प्रकाशन दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी कर्नाटक राज्याचे उर्जा मंत्री मा. के. जे. जॉर्ज व छत्तीसगड राज्याचे उपमुख्यमंत्री मा. टी. एस. सिंगदेव यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे, AICC प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद, माजी आमदार दिप्तीताई चवधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभयजी छाजेड, पुणे शहर महिला प्रभारी संगीताताई तिवारी आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विविध विकास योजना, नागरी सुविधांचे जाळे, आणि नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. मा. दत्ता बहिरट यांनी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील प्रगतीसाठी महत्त्वाचे संकल्प आणि प्रकल्प हाती घेण्याचे आश्वासन दिले आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दत्ता बहिरट यांच्या कार्याला यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.