काँग्रेसने दिलेली 5 गॅरंटी योजना महाराष्ट्रातही यशस्वी होईल – कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री  के. जे. जॉर्ज यांचा विश्वास

पुणे :  कॉँग्रेसचे राज्य असलेल्या कर्नाटक मध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 5 गॅरंटी योजना यशस्वीपणे सुरू आहे.  आम्ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कोणतीही योजना आणत नाही, दीर्घकालीन विचार करून महाराष्ट्रात कॉँग्रेसने कर्नाटकच्या धर्तीवर 5 गॅरंटी योजना आणली असून ती राज्यात यशस्वी होईल असा विश्वास कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री  के. जे. जॉर्ज यांनी व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारक व कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री  के. जे. जॉर्ज यांनी मंगळवारी कॉँग्रेस भवन येथे प्रसार माध्यमायांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवकत्या डॉ. शमा मोहंमद,  महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना के. जे. जॉर्ज म्हणाले, विकास हा केवळ भाजप सरकारच करू शकते हा एक गैरसमज आहे. कर्नाटकातील कॉँग्रेस सरकारने हा समज खोडून टाकला आहे. कॉँग्रेस सरकारने कर्नाटकच्या जनतेला गृह लक्ष्मी, शक्ती, गृह ज्योती, अन्न भाग्य आणि युवा निधी या पाच योजनांची गॅरंटी दिली होती. गेल्या दोन वर्षा पासून  त्या सुरू आहेत. या योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला दरमहा सरासरी चार ते पाच हजार इतके प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ मिळतात. ही सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नाची संकल्पना आहे, जी गरीब कुटुंबांना थेट आर्थिक मदत पुरवते. या योजनांमुळे राज्य दिवाळखोर होईल, अशी भविष्यवाणी भाजप आणि विरोधी पक्षांनी केली होती. त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने राज्याच्या आर्थिक विकासाद्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. अन् या योजना पुढेही चालू राहतील. महाराष्ट्र सरकारने देखील अशाच गॅरंटी या निवडणुकी दरम्यान मतदारांना दिल्या आहेत. या बद्दल मला आनंद आहे.

आज पर्यंत अनेक साथीचे रोग आले. पण त्यातही पुणे हे औषध निर्मिती मध्ये अग्रेसर आहे. मात्र येथे तयार झालेली औषधे पुणेकरांना उशिरा मिळतात. अनेक आजारांमध्ये चुकीची औषधे किंवा औषधांचा तुटवडा हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्याच प्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना किमान अन्नधान्य न मिळणे, किमान गरजा पूर्ण न होणे हे देखील विकास न झाल्याची लक्षण असल्याचेही के. जे. जॉर्ज यांनी नमूद केले.

See also  वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे येथे 70 वा सहकार सप्ताह साजरा