शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल शिवसैनिकांच्या वतीने शंकर मांडेकर यांचा सन्मान

मुळशी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदी शंकर मांडेकर यांनी एकमताने निवड झाली त्यानिमित्त मुळशी शिवसैनिक मेळावा ,जय सुचंद्रका कार्यालयात पर पडला.

यावेळी विधान परिषद आमदार ,संपर्क नेते सचिन आहीर म्हणाले की गजानन थरकुडे, व संजय मोरे यांनी सदर पदासाठी मुलाखती घेतल्या त्यामधे ,संतोष मोहोळ , रविकांत धुमाळ ,शंकर मांडेकर प्रकाश भेगडे इच्छुक होते .परंतु सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी एकमुखाने शंकर मांडेकर यांचे नावाची शिफारस केली.सध्याच्या राजकीय परिस्थिती बाबत बोलताना आहीर म्हणाले, 100 गद्दारा पेक्षा 10निष्ठावंत शिवसैनिक हवे.

उपनेते व माजी आमदार रवींद्र मिर्लेकर म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपण्याची गरज आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करून शिवरायांचा भगवा फडकविण्याचे आवाहन केले.

सत्कार मूर्ती शंकर मांडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले , 500मतदार असल्या चांदे गावचा सरपंच म्हणून राजकारणात आलो व राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष , व जिल्हा परिषद सदस्य पदावर काम केले ,शिवसेनेत आल्यावर जिल्हा समन्वयक म्हणून काम केले व आज जिल्हा प्रमुख पदी निवड झाली ती केवळ मुळशी तालुका म्हणे तर भोर , वेल्हा तालुक्यातून युवक वर्ग , ज्येष्ठ नागरिक , महिला भगिनी , वारकरी बंधू भगिनी यांच्या मयेपोटी राजकीय वाटचाल यशस्वी होत आहे ,शिवसैनिक ही पक्षाची ताकद असून येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती मी 100टक्के निवडून आणतो असे सांगितले .

या प्रसंगी भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे , मुळशी प्रथम तालुका प्रमुख नामदेव भिलारे , भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे ,वेल्हा तालुका प्रमुख दीपक दामगुडे यांनी सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ ,तालूका प्रमुख सचिन खैरे, जिल्हा संघटीका संगीता पवळे , बारामती लोकसभा संघटीका स्वाती ढमाले ,ज्येष्ठ शिवसैनिक आबा शेळके ,युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश बलकवडे , माजी उपसभापती भानुदास पानसरे , शिवसहकार ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळं,माऊली केमसे,जिल्हा परिषद मा.सदस्य सागर काटकर ,जिल्हा परिषद मा.सदस्य कुलदीप कोंडे ,गणपत वाशिवले हनुमंत सुर्वे, सूर्यकांत साखरे ,राम गायकवाड , युवासेना ता.प्रमुख राम गवारे ,राष्ट्रवादी काँगेस उपाध्यक्ष नंदू भोईर, कैलास मारणे,कीर्तनकार दशरथ मानकर , हनुमंत शेलार , निवृत्ती कोळेकर ,स्वप्नील तापकीर , व शिवसैनिक ,ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने हजर होते , सूत्रसंचलन शिवाजी भिलारे यांनी केले.

See also  महाविद्यालयांमध्ये समुपदेशकाचे पद निर्माण करणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती