वाकड : हिंजवडी वाहतूक विभागाच्या अंतर्गत अवैद्य प्रवासी वाहतूक राजरोजपणे केली जात आहे विशेष बाब म्हणजे हिंजवडीच्या वाहतूक विभागाच्या पोलीस कार्यालया लगतच पोलिसांच्या समोर अवैद्य स्टॅन्ड द्वारे खाजगी वाहनातून वाहतूक केली जाते. यावर कारवाई होत नसल्याने या अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर व एजंट वर कोणाचा वरदस्त आहे यामुळे वाहतूक विभागाच्या दारात देखील कारवाई होत नाही याबाबत मात्र तपास होणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिक करत आहेत.
महामार्गावर तसेच हिंजवडीच्या व वाकडच्या हद्दीमध्ये राजरोजपणे पोलिसांच्या समोर अवैद्य वाहतूक होत असताना देखील कारवाई होत नसल्याने या परिसरात नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच या प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांना देखील वेठीस धरले जाते. अनेकदा या अवैद्य प्रवासी वाहतुकीमध्ये प्रवाशांची आर्थिक दृष्ट्या लूट देखील होते. एजंटच्या माध्यमातून होणारी अरेरावीची भाषा सातत्याने पाहायला मिळत असून काही पोलिसांच्या वरदहस्ताने या परिसरात हॉटेल रानजाई व शिवनेरी बस स्टॉप जवळ अवैद्य खाजगी गाड्यांचे स्टॅन्ड देखील पाहायला मिळते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पिवळी नंबर प्लेट ही कंपल्सरी असते परंतु अनेक वाहनांना या ठिकाणी पांढरी नंबर प्लेट आहे असे असून देखील पोलीस कारवाई करत नसल्याची बाब ही प्रवाशांचा जीव धोक्यात आणणारी आहे. सुरक्षित प्रवास करण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने होत असलेली अवैद्य प्रवासी वाहतूक व याकडे होत असलेले पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे वाकड नका परिसरामध्ये व राणजाई हॉटेल शेजारी अवैद्य वाहतुकीचे जाळे निर्माण झाले आहे.
तर काही चालक नाव न सांगण्याच्या अटीवरती पोलिसांना सर्व गाड्यांचे हप्ते पोहोचत असल्याचे दबक्या आवाजात सांगतात. महिना एका गाडीला एक हजार रुपये असे हप्ते वाहतूक पोलिसांच्या वसुली करणाऱ्यांना दिले जातात. सुमारे 200 हून अधिक गाड्यांची वसुली या चौकामध्ये होत असल्याचे खाजगी वाहन चालकाने सांगितले.
तसेच वाकड मधील शनी मंदिर इंदिरा कॉलेज जवळ इथून मुंबईला जाणारी वाहने, हॉटेल जिंजर समोरून सातारा व कराडकडे जाणारी वाहने खाजगी अवैद्य प्रवासी वाहतूक करत असताना देखील बिनधोकपणे सुरू असताना पोलिसांकडून कारवाई केले जात नाही. याउलट खाजगी इसमांकडून गाडी भरण्याचे काम केले जात असल्याचे सातत्याने पाहायला मिळते.
महामार्गावरील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी तसेच हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय मिळण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नाकाखाली असलेल्या अवैद्य वाहतुकीवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.