ज्ञानेश्वर तापकीर यांना श्री संतमल्हारपंत प्रतिष्ठानच्या वतीने “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान

पुणे : श्री संत मल्हारपंत प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त आयोजित कीर्तन महोत्सव प्रसंगी माजी नगरसेवक तथा योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांना सामाजिक सेवेबद्दल”विशेष जीवन गौरव पुरस्कार” श्री क्षेत्र नारायणपुरचे टेंबे स्वामी महाराज, भरत क्षीरसागर, माजी नगरसेवक  राजाभाऊ गोलांडे, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, श्री स्वामी समर्थ संस्थेचे सतिशदादा मोटे, कार्तिक लांडगे, निलेश नेवाळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

ज्ञानेश्वर तापकीर यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले की, मला व माझ्या योगीराज पतसंस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत परंतू आजचा मला मिळालेला पहिला “जीवन गौरव पुरस्कार” आहे. मी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत निःस्वार्थी भावनेतून केलेल्या कामाची पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली. हे सर्व समाजहिताचे काम करत असताना मला माझ्या संस्थेच्या सहकारी संचालक मंडळाचे कायम सहकार्य लाभते म्हणून हे सर्व करू शकलो असे मला वाटते. आजचा मिळालेला पुरस्कार मी श्री दत्त चरणी व प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या पायावर समर्पित करतो असेही यावेळी आवर्जून सांगितले.

याप्रसंगी श्रीराम समर्थ पतसंस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे यशराज पारखी, योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर, माजी संचालक वसंत माळी, शाखा समिती सदस्य दत्तात्रय भापकर, प्रदीप नेवाळे, पंढरीनाथ गायकवाड, पांडुरंग कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे व सर्व स्टाफ उपस्थित होते.

See also  जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन व बालेवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी हायस्ट्रीट येथे पादचारी दिन साजरा