विद्यार्थी उद्योजकांनी चार दिवसात दहा लाखाची उलाढाल: माॅडर्न गणेशखिंड मध्ये विक्रमी बिझनेस

पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात विविधा- प्रदर्शन व विक्री २०२५ हा कार्यक्रम संपन्न झाला.विद्यार्थी उद्योजकांनी चार दिवसात दहा लाखाची उलाढाल करत माॅडर्न गणेशखिंड मध्ये विक्रमी बिझनेस केला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्रसिध्द उद्योजक श्री सुधीर राशिंगकर म्हणाले,” विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याची उर्मी बाळगुन स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी विविधा उपक्रमाच्या रूपाने महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे बीज पेरते आहे असे म्हणाले. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काही नामवंत कंपन्यांची निर्मिती कशी झाली हे सांगून, उद्योग हे रिकाम्या वेळेत करायचे काम नसून वेळ आणि कष्ट देवून उद्योजक व्हावे आणि अपयश आले तर पुन्हा शुन्यातून विश्वास निर्माण करण्याची जिद्द ठेवा.”

हा कार्यक्रम माजी विद्यार्थी संघटना मॉडनाईटस् यांच्या मदतीने हा कार्यक्रम चालवण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनांना चालना देऊन विविध हस्तकला वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे, वस्त्रांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाते. तसेच, यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, पोस्ट आणि घोषवाक्य स्पर्धा घेतल्या जातात. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. ज्योती गगनग्रास ह्यांनी विविधा ह्या उपक्रमाची ओळख करून दिले. गेल्या 22 वर्षापासून चालणाऱ्या या या उपक्रमाची ख्याती पाहून संगीत, नाट्य, सिनेमा राजकीय क्षेत्रातील कलावंत या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येतात.
प्रमुख पाहुणे सौ. मेघा हलभवी यांनी उद्योजक होताना कोणते कौशल्य महत्त्वाचे असतात काय काळजी घ्यावी, कोणता क्षेत्र निवडावा ह्या सर्व गोष्टीं बारकाईने समजावून त्यावर चर्चा केली. विद्यार्थ्यांना पैशांचा हिशोब ठेवा, देवाण घेवाण करा, नाते संबंध जपा आणि संपर्क वाढवा असा संदेश त्यांनी दिला.


संध्याकाळी रंगतरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रा. प्रसाद देशमाने आणि प्रा. शुभांकर वाघोले यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला. त्यात विद्यार्थ्यांनी पोवाडा, गायन, अवादन व नाट्य सादर केले.
विविधा या उपक्रमाच्या सलग दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सायकल रॅली पोस्टर स्पर्धा याने सुरुवात झाली तर यशोगाथा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात तालुका क्रीडा अधिकारी सौ श्रद्धा सावंत, गीतकार आणि संगीतकार श्री आनंद मुरगुलकर, राजनीती तज्ञ श्री वैभव माने, उद्योजक श्री प्रसाद भगत, संगीतकार श्री आलाप परदेशी हे माजी विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी काम करतात त्यांना आमंत्रीत केले. त्यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि काही मजेदार किस्से सांगितले.संध्याकाळच्या सत्रात स्वरारंभी प्रस्तुत अयोध्येत प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांसमोर गीत रामायण सादर करणारे पुण्यातील सुप्रसिद्ध कलाकार व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री तुषार रिठे, विघ्नेश जोशी,चैतन्य प्रभु, सौरभ कुलकर्णी व आदित्य आपटे यांनी महाविद्यालयात गीत रामायण सादर केले आणि संगीतमय सांगता केली.

See also  महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील


या कार्यक्रमाच्या सलग तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मॉडर्न शेफ ही स्पर्धा पार पडली. ह्या वर्षी या स्पर्धेचा विषय विसमरणातले पदार्थ असा होता. त्यानंतर आरजे आणि संपादक ह्यांची मुलाखत झाली. या वेळी आरजे अपूर्वा, आरजे बंड्या आणि श्री. अविर नलावडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला.दुपारच्या सत्रात आई बाबा माझ्या महाविद्यालयात हा उपक्रम पार पडला. शिक्षकांनी पालकांशी संवाद साधला महाविद्यालयाचे, शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
चौथ्या दिवशी सकाळी पथनाट्य सादर झाली.पथनाट्याचे परिक्षण श्री बद्रिश कट्टी व डाॅ अशोक कुंडले यांनी केले.


ह्या वर्षी एकूण 47 विविध स्टॉल होते. एकुण विक्री दहा लाख रुपयांची विक्री झाली. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी सहाय्य करून कार्यक्रम पार पाडले.या कार्यक्रमाचे समन्वय डाॅ ज्योती गगनग्रास,उपप्राचार्य, प्रा विजया कुलकर्णी यांनी केले. प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर, उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.