झाशी राणी चौक शिवसेना शाखेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

पुणे : हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना झाशी राणी चौक या शाखेच्या वतीने झाशी राणी चौक येथील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात 220 रक्तदात्यानी रक्तदान करून स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. या शिबिराचे आयोजन प्रशांत बधे शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुणे, व विलास सोनावणे शहर समन्व्यक शिवसेना पुणे यांनी केले होते

See also  शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे - रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट महायुती व घटक पक्ष कार्यकर्ते बैठक संपन्न