‘मी विथ मम्मी’ कोंढवे- धावडेत उपक्रमास प्रतिसाद

शिवणे : ‘मी विथ मम्मी’, या उपक्रमानंतर्गत महिला व मुलांसाठी एक मिनिटाचे विविध मनोरंजक खेळ होते. यामध्ये जिंकणाऱ्याना बक्षिसे आणि सोबतीला होती खाऊ गल्ली. यास शिवणे, उत्तमनगर, कोंढवे- धावडे, कोपरे येथील सहभागी आई व मुलांनी मजा- मस्ती केली.

पंढरीचे वारकरी भजन संध्या कार्यक्रमात संताच्या पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशीला जमतात. असे वातावरण तयार झाले होते. श्रीविठ्ठल व श्रीरुक्मिणी माता, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची सामुदायिक महाआरती, दर्शन सोहळा, फराळ वाटप करण्यात आले. प्रभाग समितीचे माजी सदस्य सचिन विष्णु दांगट यांच्या वाढदिवसानिमिताने खडकवासला भाजपच्या महिला अध्यक्षा ह.भ.प.ममता सचिन दांगट यांनी कार्यकर्माचे आयोजन केले होते.


‘माझ्या वडिलांनी भाताची खाचरे सांभाळत, ३० वर्षे रिक्षा चालविली. आमचा सांभाळ केला. वडिलांच्या कष्टाची जाणीव म्हणून १०० रीक्षांना पावसाळी दरवाजेचे कव्हर आमदार भीमराव तापकिर यांच्या हस्ते दिले. कोरोना काळात आवर्जून मी रिक्षा चालकांना विशेष मदत केली होती.गेली तीन सीनजीचे कूपन’ असे सचिन दांगट यांनी सांगितले.
आमदार भीमराव तापकीर, म्हणाले, “सचिन विष्णु दांगट याची सामान्य नागरिकांची समस्या प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतो. शिवणे भागातील मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यंदा त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभाव वृत्तीने नागरिकांसाठी योग्य कार्यक्रम घेतले आहेत.”

यावेळी आमदार भीमराव तापकीर, सचिन मोरे, निखिल दांगट, संतोष देशमुख, उमेश सरपाटील, रमेश धावडे, सुभाष नाणेकर, भगवान मोरे, अभिजीत धावडे, गणेश वांजळे, श्रीनाथ साळुंके, यज्ञेश पाटील, माजी उपसरपंच मनीषा मोरे, नीलिमा गावंडे, स्मिता धावडे, हरिदास चरवड, सायली वांजळे, किरण बारटक्के, भारतभूषण बराटे, मारुती किंडरे, बाबा धुमाळ, किशोर पोकळे, सागर भुमकर, सुरेश धावडे, प्रकाश साळवे, हणतोड धावडे, भगवान शिंदे, निखिल धावडे, अभीषेक धावडे, सुरेंद्र यादव, संतोष मोरे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भागातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  सुसरोड परिसरातील रस्त्यावरील विविध समस्यांची पाहणी