पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासून मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

पुणे : अखंड मराठा समाज पुणे यांच्यावतीने अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे येथे सामूहिक आमरण उपोषण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर २९/१/२०२५ पासून करण्यात येणार आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाच दिवस पूर्ण झाले आहे तरी देखील शासनाच्या वतीने याची दखल घेण्यात आली नाही. मराठा समाजाच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जात नाही त्यामुळे मराठा समाजाच्या वतीने पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहेत. तसेच सामूहिक उपोषणाच्या माध्यमातून शासनाला इशारा देण्यात आला आहे. तसेच याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांना मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात करण्यात आले.

See also  बस डेपो मॅनेजरचे महिला कंडक्टरसोबत अश्लील कृत्य; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न