बाणेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

बाणेर : स्वराज्य संस्थापक   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या  मुहूर्तावर पुणे लोकसभा निवडणूक संदर्भात महाविकास आघाडीच्या पाषाण बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे सुतारवाडी बावधन सोमेश्वरवाडी आघाडीच्या नियोजनाची बैठक कुंदन गार्डन मंगल कार्यालय बाणेर येथे झाली.

सदर बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडी व इंडिया फ्रेंड चे पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांना विजयी करण्यासाठी एक दिलाने काम करून  सर्वांनी निश्चय यावेळी करण्यात आला.

यावेळी औंध-बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सुस-म्हाळुंगे भागातील कॉँग्रेस, शिवसेना ( UBT ), राष्ट्रवादी ( SPG ) मधील जेष्ठ – युवा पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.  नाना वाळके, रणजित शिंदे, सचिन नाखाते, दिलीप धायगुडे, ओंकार साळुंके, मंगेश रामदास निम्हण, योगेश रोहिदास सुतार, शैलेन्द्र बापूराव कदम, गणेश सुरेश सुतार, समीर सदाशिव जगताप, माजी नगरसेवक राम काळे, महादेव नेटके, संभाजी नेटके, जीवन निवृती चाकणकर , बाळासाहेब भांडे, संभाजी महके, दत्ता जाधव, अमर लोंढे, नितिन चांदेरे, मकरंद कळमकर, सुनिल जाधवर, शिवाजी बांगर, मयुर भांडे, महेश सुतार, करण भांडे, हरिष होडमे, संतोष तोंडे, लक्ष्मण दिघे, अशोक दळवी, संजय निम्हण सर्व भागातील पदाधिकारी उपस्थित होते.

See also  धर्मयुद्ध म्हणजे सत्याचा असत्यावर, नीतीचा अनीतीवर, प्रेमाचा द्वेषावर प्रहार- राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन; राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे पहिल्या वारकरी संमेलनाचे उद्घाटन