मध्यमवर्गीयांच्या संवेदनशीलतेचा विचार अर्थसंकल्पात – आमदार सिद्धार्थ शिरोळे

आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे : देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार असलेल्या मध्यमवर्गाचा संवेदनशीलतेने विचार अर्थसंकल्पात झालेला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे.एमएसएमई व स्टार्टअपला विस्तारासाठी सढळ हाताने मदत व धोरणनिश्चितीमुळे उद्यमशीलतेला चालना आणि रोजगारालाही गती मिळणार आहे. पायाभूतसुविधांसाठी भरघोस तरतूद करीत धोरणसातत्य दाखवले गेलेले आहे. विकसित भारतासाठीची मजबूत पायाभरणी या अर्थसंकल्पाने केलेली आहे, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे मनापासून आभार!

See also  ‘आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून’केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ