श्वास आणि पाण्यापेक्षा मानवी जीवनामध्ये काहीच किमती नाही – सोनम वांगचुंग; मुळा नदी वाचवण्यासाठी बाणेर मध्ये चिपको मोर्चा अभिनेते सयाजी शिंदे व सोनम वांगचुंग यांचा सहभाग

बाणेर : आपण झाडांना वाचवतोय म्हणजे आपण हवेला वाचवत आहे म्हणजे आपल्या श्वासांना वाचवत आहोत. नदीला वाचवत आहोत म्हणजे पाण्याला वाचवत आहोत आणि श्वास व पाण्यापेक्षा आणखीन किमती काहीच नाही. सरकार सुद्धा नागरिकांच्या पसंती नुसार आपल्या धोरणांमध्ये बदल करेल अशी आशा आहे असे लडाख येथील पर्यावरण चळवळीचे कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांनी सांगितले.

मुळा राम नदी संगम, बाणेर येथे हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी एकत्र येत चिपको आंदोलन करत केंद्र राज्य व पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या नदीपात्रातील कामाला विरोध करत झाडे वाचवण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये लडाखमधील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते सोनम वांगचुंग तसेच महाराष्ट्राच्या पर्यावरण चळवळीतील अभिनेते सयाजी शिंदे यांनी लाँग मार्च मध्ये सहभाग घेतला.

हजारोंच्या संख्येने नदी सुधार प्रकल्प हटाव और नदीया बचाव साठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील हजारोंच्या संख्येने संवेदनशील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.  वांगचुक यांनी नागरिकांच्या एकजुटीचे कौतुक केले आणि नद्या काँक्रीटमुक्त राहण्यासाठी लढ्यासाठी प्रोत्साहित केले आणि शुभेच्छा दिल्या.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुण्यातील नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोचवण्यासाठी शब्द दिला आणि नदीकाठी असणारी देवराई, पाण्याचे झरे पाहिले तसेच झाडांना मिठी मारून चिपको आंदोलनात सहभाग घेतला झाडे वाचवण्याचा संदेश दिला.

यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध पर्यावरण संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

See also  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना दिले मृत मासे भेट दिले