बाणेर : बाणेर येथे रोहन लेहर ३ सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
रोहन लेहर सोसायटीमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच किल्ल्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली होती. सोसायटीतील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सोसायटीमध्ये ढोल ताशांच्या गजरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शालेय मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.