औंध मध्ये बहुजन प्रतिपालक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपाई(आ )च्या वतीने शिवरायांची पुस्तके वाटून जयंती साजरी

औंध  : औंध मध्ये बहुजन प्रतिपालक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपाई(आ )च्या वतीने शिवरायांची पुस्तके वाटून जयंती साजरी करण्यात आली.

रयतेचे राजे,कुळवाडी भूषण,बहुजन प्रतिपालक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त औंध मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास रिपाई च्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मा.रमेश ठोसर यांच्या हस्ते शिवाजी कोण होता?,शिवशाही ,शिवचरित्र इत्यादी पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी दिलीप गायकवाड,निलेश ठोसर,स्वप्नील पालके,दिनेश ठोसर ,अविराज पाचारे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  सहकार चळवळीचा गुणात्मक विकास होण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण द्यावे-महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे