पाषाण : पाषाण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेला बहुप्रतिक्षित सी एन पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सुरू करण्यात आला. यामुळे पाषाण सुतारवाडी सुसरोड सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी हा पेट्रोल पंप सुरू केला आहे.
एच.पी.कंपनीच्या सी.एन. पेट्रोल पंपाचे उद्घाटन समाजभूषण शांताराम महाराज निम्हण व एच.पी.चे झोनल ऑफिसर प्रसाद सावजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर शंकरराव निम्हण, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, माजी नगरसेवक सनी निम्हण, डॉ.दिलीप मुरकुटे, मृदुंगाचार्य पांडुरंग आप्पा दातार, दहीभाते महाराज, संतसेवक मारुती कोकाटे, अशोक मुरकुटे, संजय मुरकुटे, संजय निम्हण, अजय निम्हण, अशोक दळवी, तुषार निम्हण, अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, उमेश कंधारे आदी उपस्थित होते.
यावेळी तानाजी निम्हण म्हणाले, पाषाण परिसरातील नागरिकांची पेट्रोल डिझेल बाबत होणारी गैरसोय दूर करण्यात यश आले याचा आनंद आहे. सीएन पेट्रोल पंपाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या गुणवत्तापूर्ण सुविधा ग्राहकांना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू.
यावेळी पाषाण बाणेर बालेवाडी सुतारवाडी सोमेश्वरवाडी सुस रोड बाणेर पाषाण लिंकरोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून पेट्रोल पंपाची सुरुवात करण्यात आली.