बाणेर येथील अग्निशमन केंद्र सुरू

बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि अत्यंत गरजेची फायर स्टेशन सुविधा अखेर सुरू झाली आहे. या सुविधेच्या उभारणीचा लढा २०१५ पासून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता आणि त्या दीर्घकालीन संघर्षाला यश आले आहे. या फायर स्टेशनची पाहणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली.

या भागातील वाढती लोकसंख्या, उंच इमारतींची संख्या आणि आपत्ती अथवा अपघाताच्या वाढत्या शक्यता लक्षात घेता, फायर स्टेशन ही प्राथमिक आणि अपरिहार्य गरज होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुविधा अत्यावश्यक होती.

२०१८-१९ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि दीड वर्षांपूर्वीच हे काम पूर्णत्वास आले होते. मात्र प्रशासकीय पातळीवरील विलंबामुळे सुविधा सुरू होण्यास वेळ लागला.
या संदर्भात २४ डिसेंबर २०२४ रोजी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन फायर स्टेशन तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी अमोल कालवडकर यांनी केली होती. त्यानंतर संबंधित विभागांमार्फत त्वरीत कार्यवाही झाल्यानंतर अखेर ही सुविधा सुरू करण्यात आली.

यामध्ये विशेष म्हणजे, अत्याधुनिक अशा उंच शिडीच्या २ अग्निशामक गाड्या (फायर व्हेईकल्स), तसेच अधिकारी व कर्मचारीवर्ग यांचीही पूर्ण उपलब्धता प्रशासनाने करून दिली आहे.

बाणेर अग्निशमन केंद्र येथे दिलेल्या भेटीप्रसंगी अमोल बालवडकर, केंद्रप्रमुख श्री. शिवाजी मेमाणे, प्रभारी अधिकारी श्री. प्रमोद मरळ, तांडेल श्री. गणेश शिंदे, फायरमन सागर ठोंबरे, महेश गारगोटे, ज्ञानेश्वर गायकवाड, अजित बिचकुले, ऋषिकेश जरे, विशाल गेंगजे, प्रणित ईलपाते, सुमित गाजरे, अक्षय गायकवाड, राजन भालचिम, श्रीजीत सस्कर, आकाश मेंगडे आदी उपस्थित होते.

See also  मोदींचा हा नैतिक पराभव - पृथ्वीराज चव्हाण