मैत्री युवा प्रतिष्ठान तर्फे  पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांसाठी एक टन नाष्ट्याची व्यवस्था

सातारा : मैत्री युवा प्रतिष्ठान तर्फे  पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांसाठी नाष्ट्याचा कार्यक्रम फलटण तालुक्यातील विडणी येथे आयोजित केला होता.

सर्व साहित्य मिळून  जवळपास एक टन कांदेपोहे व उपीट असा नाष्टा वाटप मैत्री युवा प्रतिष्ठानच्या सभासद, मित्रपरिवार व देणगीदार यांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पडला.
मैत्री युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भोसले, मनोज बाठे ,मिलिंद आहेर , सागर गायकवाड, उद्धव वांजले तसेच पदाधिकाऱ्यांकडून उत्तम नियोजन करण्यात आले होते.

See also  परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यूच्या निषेधार्थ रमेश ठोसर यांच्या नेतृत्वाखाली औंध मध्ये निदर्शने आंदोलन