२२९ वा “सॅटर्डे क्लब”पुणे मेट्रोमध्ये साजरा

पुणे : २२९ वा “सॅटर्डे क्लब” पुणे मेट्रोमध्ये साजरा करण्यात आला.सिविल कोर्ट ते पीसीएमसी व परत सिविल कोर्ट या मेट्रो प्रवासात सॅटर्डे क्लब संपन्न झाला. रात्री ८ वाजता मेट्रो प्रवास करीत असताना मेट्रोचे महासंचालक डॉ. श्रावण हर्डीकर तसेच कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी सॅटर्डे क्लब सदस्यांचे स्वागत केले व त्यांनी सॅटर्डे क्लबच्या सदस्यांसोबत समवेत प्रवास देखील केला.


श्री हेमंत सोनवणे यांनी वनाज ते रुबी हॉल व सिविल कोर्ट ते पीसीएमसी या दरम्यान झालेल्या मेट्रोच्या प्रगतीचा अहवाल कथन करीत असताना, कशा पद्धतीने मेट्रो केली गेली, किती अडचणी आल्या त्या सामंजस्याने कशा सोडवल्या हे देखील सांगितले व मेट्रोच्या पुणेकरांच्या प्रतिसादाबद्दल समाधान देखील व्यक्त केले.


डॉ. श्रावण हर्डीकर यांनी शिवाजीनगर ते मंडई या वर्षअखेरीस ही मेट्रो सुरु होईल. सर्वात आव्हानात्मक काम हे बुधवार पेठ स्टेशनचे होते त्या ठिकाणी असलेले छोटे रस्ते १०० वर्षा पूर्वीच्या वास्तु, नागरिकांची मोठ्या प्रमाणात वस्ती यावर मात करून आम्ही हे स्टेशन पूर्णत्वास आणले आहे आणि ते करीत असताना पुणेकरांना आणि विशेषता त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेतली होती. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील भूयारी,मुठा नदीखालून जाणारी मेट्रो देखील लवकरच सुरु होईल. स्वारगेट चे काम फारच मोठे आहे ते पूर्ण होण्यासाठी २०२५ साल उजाडेल अशी अपेक्षा आहे. रुबी हॉल च्या पुढे रामवाडी पर्यंत देखील आपण लवकरच पोहोचणार आहोत. या सगळ्या बाबतीत मेट्रो प्रवाशांची सुरक्षितता यावर आमचे प्राधान्य आहे तसेच जास्तीत जास्त सुलभ आणि सत्वर मेट्रो कशी उपलब्ध करून देता येईल याचा आम्ही अभ्यास करीत आहोत मेट्रो पर्यंत येण्यासाठी किंवा तेथे आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था याचे कडे देखील आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत.

पुणेकरांनी रस्त्यावरील वाहतुक कमी होण्यासाठी, वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन असे देखील त्यांनी केले. याप्रसंगी श्री प्रकाश देवळे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला. श्री रामदास फुटाणे यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या वात्रटिकेने समारोप झाला. श्री शेखर मुंदडा यांनी मॉडेल कॉलनीतील अंबियस हॉटेलमध्ये अतिशय नियोजन केले होते.

See also  नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे