सुजय प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर व सन्मान सोहळ्याचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी): जगता जगता रक्तदान, जाता जाता अवयव दान आणि गेल्यावर नेत्रदान या त्रीसूत्रींवर  काम करणारे सुजय प्रतिष्ठान तर्फे १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ पुणे येथे भव्य रक्तदान शिबिर व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव (I.P.S), रुपेश पार्टे (अध्यक्ष) हेमंत मोरे (सचिव), संजय सकपाळ (कार्याध्यक्ष), सुधीर सकपाळ (खजिनदार), योगेश चव्हाण (उपाध्यक्ष) ऋषिकेश सकपाळ, योगेश पंधारे आदी उपस्थित होते.

मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे सुरेश सकपाळ यांचे हे शंभरावे रक्तदान असून कार्यक्रमाला सर रतन टाटा बिजनेस एक्सलन्स अवॉर्ड विजेते किसन भोसले, विशेष पोलीस महा. निरीक्षक विठ्ठल जाधव, बेलराईज इंडस्ट्रीज एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सुप्रिया बडवे, प्रसिद्ध उद्योजक रामदास माने, अप्पर जीएसटी आयुक्त शिवकुमार साळुंखे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर उद्य जगताप, बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीश मेंगे, सुनील मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.

सन्मान सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय चौगडा वादक, पर्यावरण, पत्रकारिता, वैद्यकीय मदत, रक्तदान, शिवकार्य आदी क्षेत्रांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान होणार आहे. शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप असणार आहे. रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

See also  आळंदी वारकऱ्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार ; घटनेचा विविध स्तरातून निषेध