बालेवाडी : श्री.शिवराज मित्र मंडळ बालेवाडी वर्ष ३२ वे आहे.
बालेवाडी येथील श्री.शिवराज मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा शिव मंदिराचा भव्य देखावा सादर केला आहे.
पारंपारीक वाद्यांच्या गजरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गणरायाचा आगमन सोहळा संपन्न झाला. तसेच शेवटच्या दिवशी देखिल डिजे मुक्त संकल्पनेनुसार ढोल ताशा पथकाच्या गजरामध्ये बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या समितीच्या वतीने सांगितले.
गेली ८ वर्षांपासुन सातत्याने श्री.शिवराज मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी खास “सन्मान स्त्री शक्तीचा” या उपक्रमाअंतर्गत खास परिसरातील शेकडो महिलांच्या हस्ते श्री.च्या महाआरतीचे आयोजन केले जाते. यामध्ये परिसरातील शेकडो महिला एकत्र येवुन अतिशय उत्साहाने सहभागी होतात. यावर्षी शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी या महिलांच्या महाआरतीचे आयोजन मंडळाच्या वतीने केले आहे.
तसेच सामाजिक व शैक्षणिक भान जपत श्री.शिवराज मित्र मंडळाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, गणेश जयंतीच्या निमित्ताने महाप्रसाद, मोफत नेत्र तपासणी असे सैमाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवात १० दिवस मंडळाच्या वतीने दरवर्षी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा तसेच बाल गणेश भक्तांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले जाते व या खेळातील विजयी खेळाडुंना आकर्षक बक्षिसे दिले जातात.
