पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

पुणे, दि. २३ : लोकशाही बळकट व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये आयोजित पालकसभेत  लोकशाहीचे महत्त्व सांगून मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. तसेच शिवाजीनगर मतदार संघातील मागील लोकसभा निवडणुकीमध्ये   सर्वात कमी मतदान झालेल्या भागात आणि बोपोडी येथील जेष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, युवकांशी संवाद साधून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आणि  कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले.

कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये  नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.   मतदार यादीत जर  नाव तपासणे, नवयुवांची नावनोंदणी, क्यूआर कोडचा वापर करुन नाव नोंदणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील विश्रांतवाडी येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत   मतदार जनजागृती मंचाची  स्थापना करून कर्मचारी व उपस्थित नागरिकांना मतदार हेल्पलाइन, सी-व्हीजिल अँप बद्दल माहिती देण्यात आली. तर पर्वती मतदार संघातील आदम बाग मस्जिद येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेऊन मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

See also  पुणे बुलेटिन न्यूज पोर्टलचे उद्घाटन