पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत उपआयुक्त (पर्यावरण) श्री. रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेकरी असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत स्वच्छ इंधनाचा वापर करून पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

शहरी भागांमध्ये हवा प्रदूषणाचे वाढते गंभीर परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवा प्रदूषण कमी करणे करिता याबाबतची मार्गदर्शक तत्वे यापूर्वी जारी करण्यात आलेले असून स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबत त्यांच्या हद्दीतील बेकऱ्या, रेस्टॉरंट, ढाबा इत्यादीमध्ये हरित इंधनाचा वापर सुरू करण्यात यावा  असे आदेश दिलेले आहेत.

या बैठकीत बेकरी असोसिएशनतर्फे माहिती देण्यात आली की, पुणे शहरात जवळपास 750 बेकऱ्या कार्यरत असून उपनगरात जवळपास 200 ते 250 बेकऱ्या आहेत, त्यांपैकी बहुतेक बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केला आहे. तथापि, काही बेकऱ्या अद्याप रूपांतरणाच्या प्रक्रियेत आहेत. बैठकीदरम्यान बेकरी असोसिएशने स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी उप आयुक्तांसमोर मांडल्या तसेच यासाठी पुणे महापालिकेमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

हवा (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ३१(अ) अंतर्गत हवा प्रदूषण कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB)  बेकरी/हॉटेल्स/रेस्टोरंट/खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा  यांमध्ये लाकूड, कोळसा आणि तंदूर इत्यादीच्या वापराऐवजी एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर स्रोतांचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्या बेकरी/हॉटेल/रेस्टोरंट/ खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा यांनी अद्याप एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर आधारित प्रणाली स्वीकारली नाही, त्यांनी तात्काळ रूपांतरण करणे आवश्यक आहे. अन्यथा  या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

See also  सुसखिंड येथील पुलावरील उतरण्यासाठी सर्विस रस्ता करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी ; वाहतूक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची घेतली भेट