जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या राजीनाम्याची व पार्थ पवार यांच्यावर फौजदारी कारवाई करा; आम आदमी पार्टीची मागणी

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस महायुती सरकारच्या घटक पक्षांकडून होत असलेल्या जमीन घोटाळ्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, पुणे शहरातील जमीन घोटाळ्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज आंदोलन करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या मुलाकडून नुकताच पुण्यातील कोरेगाव भागातील 40 एकरांचा भूखंड लाटण्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. महार वतनातील सदर भूखंड रद्द झालेला सातबारा उतारा व बनावट कागदपत्रांच्या आधारे गिळंकृत करण्याचा प्रकार नुकताच घडला. सदर जमिनीच्या खरेदीचा व्यवहार करताना राज्याचा महसूल देखील बुडवण्याचा प्रकार घडला असून 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी अधिकाऱ्यांनी कोणत्याही ठोसकारणाशिवाय माफ करून सरकारी तिजोरीवर डाका टाकण्याचा प्रकार केल्याचे समोर आले आहे. अंदाजे 1800 कोटी किंमत असलेल्या या भूखंडाची विक्री केवळ 300 कोटीला केल्यामुळे समाजाच्या वेगवेगळ्या घटकांकडून याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सदर प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगितले असले तरी केवळ अजित पवार यांचा पुत्र असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले व सदर व्यवहारावर असणारी स्टॅम्प ड्युटी माफ केली असा सूर आता नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अजित पवार वारंवार कर्जमाफी मागू नका म्हणून सल्ला देतात, परंतु त्यांचाच पुत्र असलेले पार्थ पवार हे राज्याची फसवणूक करून लूट करत असल्याचे समोर आले आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले माझा या प्रकरणाशी  संबंध नाही, परंतु चार महिन्यापूर्वी असा काही प्रकार सुरू होता याची मला कूणकूण लागली होती व त्याला मी आक्षेप घेतला होता. असे माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हटले असल्याने त्यांना या सर्व प्रकरणाबाबत माहिती असून देखील त्यांनी या प्रकरणावर कारवाई का केले नाही? असा प्रश्न आम आदमी पार्टीने आंदोलनावेळी उपस्थित केला.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी झाले असून काही दिवसांपूर्वीच पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री यांच्यावर देखील जैन बोर्डिंग ची जागा हडपल्याचे आरोप झाले होते. हे सर्व प्रकार पाहता महायुती सरकार ही केवळ भ्रष्टाचार करण्यात व्यस्त असून दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची त्यांना कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येते, तसेच पुणे शहरात सुरू असलेल्या गुन्हेगारी बाबत देखील ते गंभीर नसल्याचे जाणवते असा आरोप यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.

See also  राजस्थान मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात भाजपाच्या विजयाचा पुण्यात आनंदोत्सव

जमीन घोटाळ्याच्या सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री व या घोटाळ्यातील कथित आरोपी पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जेणेकरून तपासावर त्यांचा कोणताही प्रभाव पडणार नाही अशी जाहीर मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, राज्य सहसचिव अमोल मोरे, शहराध्यक्ष धनंजय बेनकर, उपाध्यक्ष हारुन मुलानी, शेखर ढगे, श्रद्धा शेट्टी, शमीम मुलानी, मनोज शेट्टी, महासचिव अक्षय शिंदे, सतीश यादव, सुभाष कारंडे, महिला शहराध्यक्ष सुरेखा भोसले, सचिव शंकर थोरात, शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग, सुनील सावदी, शहर प्रवक्ते किरण कद्रे, निखिल खंदारे, गजानन भोसले, निलेश वांजळे, मीडिया संयोजक अॅड. अमोल काळे, विकास चव्हाण, फेबियन सॅमसंन, कुमार धोंगडे, गजानन भोसले, शिवाजी डोलारे, रणधीर, सुनील भोसले, संजय कटारनवरे, श्री.ओझा
हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, राज्य सहसचिव अमोल मोरे, शहराध्यक्ष धनंजय बेनकर, उपाध्यक्ष हारुन मुलानी, शेखर ढगे, श्रद्धा शेट्टी, शमीम मुलानी, मनोज शेट्टी, महासचिव अक्षय शिंदे, सतीश यादव, सुभाष कारंडे, महिला शहराध्यक्ष सुरेखा भोसले, सचिव शंकर थोरात, शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग, सुनील सावदी, शहर प्रवक्ते किरण कद्रे, निखिल खंदारे, गजानन भोसले, निलेश वांजळे, मीडिया संयोजक अॅड. अमोल काळे, विकास चव्हाण, फेबियन सॅमसंन, कुमार धोंगडे, गजानन भोसले, शिवाजी डोलारे, रणधीर, सुनील भोसले, संजय कटारनवरे, श्री.ओझा
हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.