बाणेर : कृष्णकांत ठाणावाला यांनी वयाच्या 85 व्या वर्षी बाणेर टेकडी सर करत वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला. आरोग्य व वृक्ष संवर्धनाचा संदेश यावेळी ठाणावाला यांनी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून वृक्षारोपण करत दिला.
वयाच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कृष्णकांत ठाणावाला यांनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता. बाणेर टेकडीवर वसुंधरा अभियान च्या माध्यमातून आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी ठरवले होते.
त्यानुसार बाणेर टेकडी सर करत कृष्णकांत ठाणावाला यांनी कडुलिंबाच्या झाडाचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले.
बाणेर टेकडीवर येऊन वयाच्या 85 व्या वर्षी वृक्षारोपण करणारे सर्वात अधिक वय असलेले नागरिक ठरले आहेत.
दररोज पाच किलोमीटर चालतात ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. वयाच्या 85 व्या वर्षी देखील त्यांच्या हाडांची घनता 40 इतकी आहे.
वसुंधरा अभियानचे पांडुरंग भुजबळ म्हणाले, वयाच्या 85 व्या वर्षी बाणेर टेकडीच्या पायथ्यापासून चढत माथ्यावर येऊन आपला वाढदिवस साजरे करणारे कृष्णकांत ठाणावाला हे बाणेर टेकडीवरील अभियानात सहभागी झालेले सर्वाधिक वयाचे वयोवृद्ध आहेत. बाणेर टेकडीवर या रेकॉर्डची नोंद वसुंधरा अभियान केली आहे.