बालेवाडी मध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत लहू बालवडकर यांनी नागरिकांशी संवाद साधला

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या वीरांप्रती असलेला अभिमान आत्मीयता व्यक्त करत त्यांना वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश या अभियानात बालेवाडी येथे लहू बालवडकर यांनी सहभाग घेत. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत या अभियानाची माहिती दिली.

या मातीच्या माध्यमातूनच अमृत वाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतमातेच्या वीराप्रती असलेली कृतज्ञता अभिमान व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन या अभियानाची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

See also  कर्वे रोडवरील वाहनाच्या पार्किंगसाठी अशी व्यवस्था असणार