बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरातील पदपथांवर वाढत चालेले अतिक्रमण व त्यामुळे नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेवुन औंध-बाणेर वॅार्ड ॲाफिसचे क्षेत्रिय अधिकारी श्री.गिरीष दापकेकर यांना प्रत्यक्ष भेटुन बाणेर-बालेवाडी अतिक्रमण मुक्त पदपथ करण्यासंदर्भात निवेदन माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिले.
यावेळी बाणेर-बालेवाडी परिसरातील सर्व पदपथांवर अतिक्रमण करणारे पथारीवाले, छोटे व्यावसायिक, खाद्य विक्रेते व टॅम्पोस्टॅाल, भाजीवाले यांच्यावर तातडीने कारवाई करुन हे सर्व पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी केली.
यावेळी हे अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीने “विशेष भरारी पथकाद्वारे” कारवाईला सुरुवात करुन सर्व अनधिकृत पथारीवाले, खाद्य विक्रेते व टेम्पो स्टॅाल, भाजीवाले यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन क्षेत्रीय अधिकारी श्री.दापकेकर यांनी दिले. पुढील एक आठवडा भरारी पथकाच्या सहाय्याने हि कारवाई सातत्याने बाणेर-बालेवाडी परिसरात करण्यात येईल असे देखिल त्यांनी सांगितले.