पुणे : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय फॉर विमेन्स पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागातर्फे मानवता सेवा, गरजूंसाठी मदत हा उपक्रम १० जानेवारी २०२६ रोजी जनसेवा फाउंडेशन अनाथालय भिलारेवाडी पुणे येथे राबविण्यात आला.
हा उपक्रम भारती विद्यापीठाचे संस्थापक चान्सलर माननीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रॉ-व्हाइस चान्सलर मा. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला. या उपक्रमात १८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत अनाथालयातील मुलांना अन्नधान्य कपडे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप केले.
प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी हा उपक्रम भारती विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी मूल्यांचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले. विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. आर. पाटील व उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी प्रा. डॉ. एस. ए. इटकरकर आणि प्रा. डॉ. के. आर. चौधरी यांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
हा उपक्रम करुणा सेवा आणि समाजाशी नातं घट्ट करणारा ठरला असून भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
























