बालेवाडी : बालेवाडी हायस्ट्रीट येथे छठ महापर्वानिमित्त सूर्य भगवानाला सायंकाळचे अर्घ्य अर्पण करण्यात आले.
उत्तर भारतीय बांधवांसह महाराष्ट्राच्या भूमीवर एकत्र येऊन हा पवित्र सण मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. छठी माया आणि सूर्य देवाला समर्पित हा चार दिवसांचा अध्यात्मिक सण परिवाराच्या आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो.
कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अमोल बलवडकर यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाचाही कार्यक्रम सुरळीत पार पडला.
या प्रसंगी पोलीस सहआयुक्त श्री. रंजन शर्मा यांची पत्नी सौ. आभाकिरण शर्मा, अमोल बलवडकर, सौ. संगीता तिवारी, अरविंद सिंह, आलोकजी, आणि श्वेता पांडे उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.






















