नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला.
श्री रूपिंदर सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६ च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते केंद्र शासनाच्या युनिक आयडेंटिफिकिशेन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) येथे उपमहासंचालक पदावर सात वर्ष कार्यरत होते.
युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया एक वैधानिक प्राधिकरण असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत संस्था आहे. ही वैधानिक संस्था केंद्र सरकारद्वारे आधार कायदा 2016 च्या तरतुदींनुसार स्थापन करण्यात आली आहे.