महाळुंगे | प्रतिनिधी : महाळुंगे येथील इक्विलाईफ होम्स सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सोसायटीतील महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण सोसायटी परिसर तिरंगी रंगांच्या आकर्षक सजावटीने नटला होता. यावेळी लहान मुलांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य, गायन व भाषणातून देशप्रेम व्यक्त केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
सामाजिक उपक्रमांतर्गत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच सोसायटीच्या मुख्य गेटबाहेरील परिसरात वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. हा उपक्रम नागरिकांकडून विशेष कौतुकास्पद ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने केले होते. यावेळी अध्यक्ष श्री. सुधीर सालीयाल म्हणाले, “लहान मुलांमध्ये देशभक्तीची भावना दृढ व्हावी, देशाबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि पर्यावरणाशी नाते अधिक घट्ट व्हावे, यासाठी समिती सातत्याने प्रयत्न करत आहे.” तसेच सर्व रहिवाशांनी समितीच्या उपक्रमांना पाठबळ देऊन नव्या पिढीपर्यंत शूरवीरांच्या बलिदानाचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष श्री. सुधीर सालीयाल, श्री. कार्तिक राज, श्री. अभिजीत चौगुले, श्री. आकाश बिराजदार यांच्यासह सोसायटीतील अनेक रहिवासी उपस्थित होते.
























