ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये बॅरिस्टर जयकर व्याख्यानमाला संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ आणि कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर जयकर व्याख्यानमालेचे दरम्यान महाविद्यालयात करण्यात आलेले होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटनसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव यांच्या हस्ते झाल.

उद्घाटनपर भाषणामध्ये बोलताना कल्याणराव जाधव यांनी बॅरिस्टर जयकर यांच्या विषयी माहिती सांगत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारच्या व्याख्यानमाला प्रेरक ठरणार असून विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेमध्ये उपस्थित राहून मिळणाऱ्या ज्ञानाचा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करून घेण्याचे आव्हान केले. 

ह्या व्याख्यानमालेच्या  प्रास्ताविकामध्ये बोलताना विभाग समन्वयक प्रा.बी.आर.घोडके यांनी या व्याख्यानमालेच्या आयोजनाबाबतची मुख्य भूमिका विषद केली. विद्यापीठाचे चार भिंतीमधील ज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचायला हवे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाकडून अशा प्रकारची व्याख्यानमाला आपल्या महाविद्यालयामध्ये राबवण्यात येत असल्याचे त्यांनी व्यक्त केले. या व्याख्यानमालेची सुरुवात प्रा.मुबीन तांबोळी यांच्या यशाचा मार्ग ‘ या विषयाने झाली. प्रा. मुबीन तांबोळी यांनी अत्यंत खुमासदार, विनोदी अंगाने सादरीकरण करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाप्रती जागं करत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली.या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प जेष्ठ सिने अभिनेते गजानन पातुरकर यांच्या ‘विनोदातून समाज प्रबोधन’ या विषयावर झाले.

विद्यार्थ्यांनी प्रवासामध्ये मोबाईलचा वापर टाळावा, विद्यार्थ्यांनी फास्टफूडच्या आहारी जाऊ नये, उत्तम आरोग्य सांभाळावे, आई-वडील आणि गुरुजन यांचा आदर करावा, त्यांना विसरू नये असे मौलिक विचार मांडले. या व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प एकपात्री कलाकार मारुती करंडे  यांनी गुंफले. आपल्या  ‘हसता खेळता माणूस बनूया’ या विषयावर बोलताना मारुती करंडे यांनी आपल्या भोवतालच्या प्राणीमात्रांवर दया करा, निसर्गावर प्रेम करा, आपल्या आजूबाजूच्या  नद्यांना शुद्ध ठेवा, एकमेकांशी संवाद ठेवा, मोबाईलचा वापर गरजेपुरताच  करा, माणूस बना आणि  माणसाशी माणसासारखेच  वागा  अशा अनेक  गोष्ठी त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना सांगितल्या.

See also  कुस्ती महर्षी विठोबा उर्फ आप्पासाहेब मानकर यांच्या स्मृति निमित्त अनाथ आश्रमाला अन्नधान्य वाटप

या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांचे मार्गदर्शन लाभले. या आयोजनामध्ये महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक आणि सहकारी कार्यालयीन सेवक आदींचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला 400 हून अधिक  विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.