भारती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पुणे : भारती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या आणि न्याय, धैर्य व लोककल्याण यांचा आदर्श घालून देणाऱ्या महाराजांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका मा. डॉ. अस्मिता ताई जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपल्याला लाभलेले स्वराज्य हे सुराज्यात रूपांतरित करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचार-विचारांत आत्मसात करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे.”

या प्रसंगी भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका मा. डॉ. अस्मिता ताई जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपल्याला लाभलेले स्वराज्य हे सुराज्यात रूपांतरित करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचार-विचारांत आत्मसात करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे.”त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. पतंगराव कदम साहेब आणि वहिनीसाहेब यांच्या धैर्य, शिस्त व संघटनशीलतेच्या समृद्ध वारसा आजही समर्थपणे जपला जात असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी नवचैतन्य निर्माण झाले.

त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. पतंगराव कदम साहेब आणि वहिनीसाहेब यांच्या धैर्य, शिस्त व संघटनशीलतेच्या समृद्ध वारसा आजही समर्थपणे जपला जात असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी नवचैतन्य निर्माण झाले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवकालीन शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणारे दांडपट्टा, तलवारबाजी, भाला यांसारख्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणात इतिहासाची झलक आणि राष्ट्राभिमानाची जाणीव प्रकर्षाने दिसून आली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवकालीन शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणारे दांडपट्टा, तलवारबाजी, भाला यांसारख्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणात इतिहासाची झलक आणि राष्ट्राभिमानाची जाणीव प्रकर्षाने दिसून आली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगला.या कार्यक्रमास धनकवडी संकुलाचे प्रमुख डॉ. राजेश क्षिरसागर, भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद तसेच भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश देशमुख यांची उपस्थिती लाभली. याशिवाय अनेक उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

See also  पथविक्रेता एकता समितीचा सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबाः अध्यक्ष दीपक मोहिते यांची घोषणा

या कार्यक्रमास धनकवडी संकुलाचे प्रमुख डॉ. राजेश क्षिरसागर, भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद तसेच भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश देशमुख यांची उपस्थिती लाभली. याशिवाय अनेक उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता इटकरकर यांनी प्रभावी आणि ओजस्वी शैलीत केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाची जाण, संस्कृतीचा अभिमान आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा जागृत झाली. परंपरेचा सन्मान राखत आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या युवा पिढीने आज पुन्हा एकदा स्वराज्याच्या मूल्यांना नव्या जोमाने उजाळा दिला.