सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने ‘सुपर सनीज विक’ चे आयोजन

पुणे : देशातील नव्या- जुन्या पिढीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माझ्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘सुपर सनीज् विक’ चे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये चित्रकला स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, बॉक्सिंग स्पर्धा, तायक्वांदो स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. या माध्यमातून युवकांच्या क्रीडा संस्कृती जागृत होईल व भविष्यात नक्कीच ते आपल्या खेळाच्या माध्यामतून आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://www.sunnynimhan.com/ या वेबसाईट आपली नावनोंदणी करा किंवा 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधा !

स्पर्धेची तारीख, वेळ व ठिकाण –
१. चित्रकला स्पर्धा
१७,१८, १९ व २४ फेब्रुवारी २०२४
सकाळी ८ ते १० दरम्यान
स्थळ- औंध, बोपोडी, खडकी, वडारवाडी, सोमेश्वरवाडी आणि साप्रस
——-
२. जिल्हा अजिंक्य बॉक्सिंग स्पर्धा
१७,१८,१९ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ४ वाजेपर्यंत
स्थळ- शहीद तुकाराम ओंबाळे मैदान, गोखलेनगर शाळेशेजारी, गोखलेनगर
——
३. जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा
25 फेब्रुवारी २०२४
सकाळी ८ वाजेपासून
स्थळ- पाषाण-बाणेर लिंक रोड, न्यू डीपी रोड,
——-
४. भव्य दे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
२० ते २५ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ४ वाजेपासून
स्थळ- इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय मैदान, औंध
——
५. जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा
२४,२५ फेब्रुवारी २०२४
सकाळी ८ वाजेपासून
स्थळ- सेन्ट्रल पार्क, आपटे रोड, डेक्कन
——
6. पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन
२५ फेब्रुवारी २०२४
पहाटे ५ वाजेपासून
स्थळ- बालेवाडी

See also  विधिमंडळ कामकाजाबाबत मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा