पवनाथडी जत्रेच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी पवनाथडी जत्रा हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे. जत्रेत सहभागी असलेल्या स्टॉलधारक महिलांनी आपला व्यवहार डिजिटल पद्धतीने करावा, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर देत आहे. पिंपरी चिंचवड शहरात भविष्यात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती कशी करता येईल, यासाठी महापालिका निश्चितच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर शकुंतला धराडे,नगरसदस्य शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, शाम जगताप,कुणाल व्हावळकर, धर्मपाल तंतरपाळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, बाबासाहेब त्रिभुवन,संजय काटे, प्रभाकर वाघेरे, तानाजी बारणे, नगरसदस्या तृप्ती कांबळे, उज्वला ढोरे,अनुराधा गोरखे,आरती चौंधे,मनिषा पवार, सुषमा तनपुरे,दिप्ती कांबळे,पल्लवी जगताप, निता पाडाळे,सुप्रिया चांदगुडे, नीता जगताप, सारिका मासुळकर,रविना आंगोळकर,योगिता नागरगोजे, कुंदा भिसे,अनिता काटे,सविता खुळे,दिप्ती कांबळे,अर्चना तापकीर, महापौर यांच्या पत्नी श्रध्दा लांडगे, तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, उप आयुक्त सिताराम बहुरे,संदीप खोत,अर्चना केरूरे, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी,विविध विभागातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी तर सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. उपस्थितांचे आभार महिला व बालकल्याण समितीच्या राणी पठारे यांनी मानले.

See also  सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे