पुणे : Pune Municipal Corporation च्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय आयोजित बैठकीत प्रभाग क्रमांक ३८ मधील पाणीटंचाईच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उपस्थित राहत लोकप्रतिनिधींनी प्रभागातील पाणीप्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे उपायुक्त नंदकिशोर जगताप तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रभाग क्रमांक ३८ मधील पाणीटंचाईची समस्या अत्यंत गंभीर असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. परिसरातील नागरिकांना पाण्याच्या मोठ्या तुटवड्याला सामोरे जावे लागत असून या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
तसेच येत्या काळात प्रभागातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीत प्रभागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली असून प्रशासनाकडून त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
























