पुणे : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्ट्रीट लाईट पोलवर टाकण्यात आलेल्या अनधिकृत इंटरनेट (नेट) केबलवर पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २८०० मीटर केबल हटविण्यात आली.
मुख्य अभियंता (विद्युत) मा. मनीषा शेकटकर, अधीक्षक अभियंता मा. प्रमोद उंडे, उप आयुक्त परिमंडळ क्र. २ मा. संतोष वारूळे, कार्यकारी अभियंता (विद्युत) मा. सुरेश पवार तसेच महापालिका सहायक आयुक्त मा. विजय नायकल यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील शाखा अभियंता (विद्युत) प्रल्हाद पवार यांनी वैशाली भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
पॅनकार्ड रोड, मालपाणी हॉस्पिटल परिसरात स्ट्रीट लाईट पोलवर टाकण्यात आलेल्या अनधिकृत नेट केबल्स काढून टाकण्यात आल्या. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, स्ट्रीट लाईट पोलवर परवानगीशिवाय टाकण्यात येणाऱ्या केबल्समुळे तांत्रिक अडचणी तसेच अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत केबल्सवर पुढील काळातही नियमित कारवाई करण्यात येणार आहे.























