पुणे : पुणे महापालिका आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये एसआयआर (SIR) मॅपिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी दुपारी बालेवाडी येथील ४३ प्रिवेट ड्राईव्ह सोसायटीमध्ये पहिल्या कॅंपद्वारे करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, ४३ प्रिवेट ड्राईव्ह सोसायटीचे चेअरमन तसेच बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांच्या पुढाकारातून या मोहिमेला प्रारंभ झाला आहे.
या कॅंपमध्ये निवडणूक अधिकारी मांजरे साहेब, पडाळे साहेब तसेच बीएलओ यांनी नागरिकांना एसआयआर मॅपिंग प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व मदत केली. नंदन स्पेक्ट्रम, ब्लिस अव्हेन्यु, संस्कृती होम्स आणि साई सिलिकॉन या सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.फेडरेशनतर्फे आशिष कोटमकर, दफेदार सिंह आणि रमेश रोकडे हे देखील उपस्थित होते. संपूर्ण कॅंप यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर बालवडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, रविवारपासून बालेवाडी परिसरातील इतर सोसायट्यांमध्येही अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करण्यात येणार असून, या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिका आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.
















